प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (ता.२५) पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये ४ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ७ ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेसाठी ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५१ पदके मिळाली.