हळदीमध्ये असलेले अँटी-एलर्जिक गुणधर्म दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. असं म्हटलं जातं की, दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात रोज हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास दम्याचा त्रास दूर होण्यास मदत होते.
दम्याच्या रुग्णांनाही योगा करण्याचा सल्ला दिला जातो. दम्याच्या रुग्णांनी रोज योगासने करून शरीर सक्रिय ठेवले पाहिजे. तसेच दिवसातून किमान 20 मिनिटे चालले पाहिजे.
थंडीमुळे श्वासोच्छवासाची समस्या देखील उद्भवते आणि ही परिस्थिती दम्याच्या रुग्णांसाठी जीवघेणी देखील ठरू शकते. थंडीत लसूण खा आणि निरोगी रहा. लसण खाल्ल्याने दम्याचा त्रास कमी होतो.
हिवाळ्यात थंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध फायदेशीर आहे. दम्याच्या रुग्णांना खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अशावेळी कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करा आणि प्या.
आल्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे आपल्याला हिवाळ्यात अनेक समस्यांपासून वाचवतात. हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी आणि तापेच्या समस्येसोबत दम्याचाही त्रास कमी होण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)