Sunday, December 22, 2024
Homeसांगलीबिबट्या : 'ती' आली अन् बछड्यांना घेऊन गेली!

बिबट्या : ‘ती’ आली अन् बछड्यांना घेऊन गेली!

वाटेगाव (ता.वाळवा) येथील खोरी शिवारात ऊसतोड सुरू असताना मंगळवारी रात्री बिबट्याची मादी व तिचा बछडा ऊसतोड मजुरांना दिसला. मजुरांची चाहूल लागताच तिथून बिबट्या मादीने बछड्याला ठेऊन पळ काढला. ऊस फड मालकाने याची माहिती वनविभाग दिल्यानंतर प्राणी मित्र आणि वनविभागाने बछडा व त्याच्या आईची भेट घडवून आणली. त्यानंतर बिबट्या मादीचा बछड्याला घेऊन गेल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कासेगाव, वाटेगाव, भाटवाडी, शेणे, परिसरात बिबट्याने ( leopard ) धुमाकूळ घातला आहे. जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केलेच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी खोरी शिवारातील शिवाजी गावडे, जगन्नाथ गावडे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची मादी व एक बछडा दिसला. गावडे यांनी याची माहिती वनविभागास दिली. वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे वनमजूर हे खोरी शिवारात आले. त्या परिसरात बछडा दिसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -