Friday, March 14, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: मुलीच्या लग्‍नादिवशीच वडिलांचे हृदयविकाराने निधन

कोल्हापूर: मुलीच्या लग्‍नादिवशीच वडिलांचे हृदयविकाराने निधन

मुलीच्या लग्‍नादिवशीच पित्याचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना आजरा येथील जिजामाता कॉलनीत घडली. प्रा. हसनसाब अब्दुल माणगावकर असे त्यांचे नाव आहे. प्रा. माणगावकर आजरा महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात हिंदी विषयाचे प्राध्यापक होते.
प्रा. माणगावकर यांची मोठी मुलगी अल्फिया हिचा गुरुवारी (दि. 27) विवाह होता. सकाळपासून सार्‍यांची लग्‍नाची धावपळ सुरू होती. यातच प्रा. माणगावकर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी आजरा व गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली.

लग्‍नासाठी आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींवर प्रा. माणगावकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. प्रा. माणगावकर हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. आजरा शहरात सामाजिक सलोखा राहावा, यासाठी त्यांची कायम धडपड असे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -