Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेमलायका अरोराने घातला असा ड्रेस की…

मलायका अरोराने घातला असा ड्रेस की…

ताजी बातमी ऑनलाइन टीम

बॉलिवूडची स्टाइलीश अभिनेत्री म्हटल्यावर पहिलं नाव मलायका आरोराचं येतं. मलायका चित्रपटसृष्टीतून लांब असली तरी वेगवेगळ्या करणांमुळे सतत चर्चेत असते. कधी तिच्या चालण्याच्या पद्धतीवरुन तर कधी तिने घातलेल्या कपड्यांवरुन तिला ट्रोल करण्यात येतं. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या आयुष्यातील खास क्षणांचा अपडेट देत असते.



मलायका अरोराने नुकताच एक फोटो (social media) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमध्ये, मलायकाने पारदर्शक ड्रेस घालून सोफ्यावर बसून पोझ देताना दिसली. मलायकाने वनपीस घतला आहे. तिचा हा वनपीस पारदर्शक आहे . या ड्रेसला साजेल अशी तिने हेअर स्टाईल केली आहे.

मलायकाचा या हटक्या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत. हा फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये ‘कवर मी इन सनशाइन’, असं लिहिलेलं आहे. तिच्या या लूकचं चाहते कौतुक करत आहेत. ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असल्याचं चाहत्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मलायकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोत मलायका अरोरा विचित्र ड्रेस घालून पोझ देताना दिसली. या फोटोमध्ये तिने शॉर्ट स्कर्टसह कोट घातला होता. तिचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -