Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया अकाऊण्टवर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली. मुलीला हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यासोबत मद्यधुंद अवस्थेत लेंगिक अत्याचार करण्यात आला. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भंवरकुआं पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. संबंधित पीडित अल्पवयीन मुलीची ओळख इन्स्टाग्रामवरुन 22 वर्षीय तरुणाशी झाली होती. भेटायच्या बहाण्याने बोलावून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मद्यपान करुन आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिता महाविद्यालयात इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -