Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : झाड कोसळून मोटारीचा चक्‍काचूर

कोल्हापूर : झाड कोसळून मोटारीचा चक्‍काचूर

मध्यवर्ती महावीर गार्डनसमोर धावत्या मोटारीवर झाड कोसळल्याने वाहनधारकांसह पादचार्‍यांची तारांबळ उडाली. या दुर्घटनेत मोटारचालक चंद्रकांत देसाई (वय 62, रा. उचगाव, ता. करवीर) जखमी झाले. मोटारीचा अक्षरश: चक्‍काचूर झाला आहे. दोन तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी उन्मळून पडलेल्या झाडाच्या फांद्या हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोल पंपादरम्यानच्या रोडवर महावीर गार्डनजवळील जुने मोठे झाड दुपारच्या सुमारास अचानक कोसळले. नेमके याचवेळी रस्त्यावरून भरधाव मोटार जात होती. मोटारीवरच झाड कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यात चालक चंद्रकांत जाधव किरकोळ जखमी झाले. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिस पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जवानांनी जाधव यांना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलविले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -