Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरबजेटचा कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, आणि चप्पलला होणार फायदा !

बजेटचा कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, आणि चप्पलला होणार फायदा !

ताजी बातमी ऑनलाइन टीम

तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, चप्पल अशा अस्सल कोल्हापुरी उत्पादनांच्या प्रमोशनाची संधी निर्माण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘वन प्रॉडक्ट, वन रेल्वेस्टेशन’ या रेल्वेच्या योजनेची घोषणा केली आहे.

‘वन प्रॉडक्ट, वन रेल्वेस्टेशन’ या योजनेंतर्गत त्या त्या भागात प्रसिद्ध असलेल्या उत्पादनांचे व वस्तूंचे भारतीय रेल्वे प्रमोशन करणार आहे. यासाठी 400 ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा विविध वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. त्या वस्तू त्या जिल्ह्यांची ओळख आहेत. कोकणचा हापूस असो वा सांगली-नाशिकची द्राक्षे, लोणावळ्याची चिक्की असो वा पुण्याची बाकरवडी, सोलापूरची चादर असो की, येवल्याची पैठणी, पालघरचे चिकू असो की, नागपूरची संत्री, या वस्तूंचे ‘वन प्रॉडक्ट, वन रेल्वेस्टेशन’ योजनेमुळे सर्वत्र प्रमोशन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -