Sunday, December 22, 2024
Homeनोकरीनागरी सेवा परीक्षेची नोंदणी सुरु, इच्छुक उमेदवारांनी असा करा अर्ज!

नागरी सेवा परीक्षेची नोंदणी सुरु, इच्छुक उमेदवारांनी असा करा अर्ज!

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षेसंबंधित अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससीने 2 जानेवारी 2022 रोजी नागरी सेवा परीक्षा 2022 आणि भारतीय वन सेवा परीक्षेसंबंधित अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा 2022ची तयारी करत असलेल्या उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे.

युपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवार 22 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस प्रिलिमरी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहे. प्राथमिक परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. मुख्य परीक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

उमेदवारांनी असा करा अर्ज –
सर्वातआधी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

– मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2022 लिंकवर क्लिक करा.

– लिंकवर क्लिक केल्यानंतर सूचना वाचा.

अधिसूचना वाचल्यानंतर नागरी सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करा.

– ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक माहिती भरा.

– तपशील नीट वाचा आणि महत्वाची कागदपत्रे अपलोड करा.

– आता सबमिट बटणावर क्लिक करा.

– अर्ज फी भरा.

– अर्ज फी भरल्यानंतर अर्ज स्क्रीनवर दिसेल.

– आता अर्ज डाऊनलोड करुन घ्या.

– अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -