Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनपतीने धोका दिला तर? या प्रश्नावर काय म्हणाली दीपिका पदुकोण, उत्तर ऐकून...

पतीने धोका दिला तर? या प्रश्नावर काय म्हणाली दीपिका पदुकोण, उत्तर ऐकून तुम्हाला बसेल धक्का

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह यांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे. रणवीर सिंह हा दीपिकावर जिवापाड प्रेम करतो. दरम्यान, दीपिका ‘गहराइयां’ या चित्रपटावरून सध्या चर्चेत आहे. ‘डूबे’ हा ट्रॅक गेल्या आठवड्यात रिलीज झाला. त्यात दीपिका पादुकोण- सिद्धांत चतुर्वेदी इंटिमेट झाले आहेत. यातून प्रेक्षकांना रोमान्सचा जबरदस्त तडका दिसणार आहे. अशातच पती रणवीर सिंह याने धोका दिला तर? या प्रश्नाला दीपिकाने दिलेले उत्तर ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

दीपिका पदुकोणला आयुष्यात अनेकदा धोका मिळाला आहे. प्रेमात तिची फसवणूक झाली आहे. त्यामुळे ती डिप्रेशनचीही शिकार झाली होती. पण, आता तिची पती रणवीर सिंहकडून फसवणूक झाली तर काय? या अनुषंगाने एका इंटरह्यूमध्ये दीपिका म्हणाली, ‘माझ्यासाठी हे डील ब्रेकर असेल, असे सरळ उत्तर देणे आणि हे स्वीकारणे माझ्यासाठी फार कठीण जाईल. नातं तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, दोघे ते नातं विश्वासाने किती किती सक्सेस करतात हे, दोघांवर अवलंबून आहे. ‘ती’ चूक होती किंवा ‘ती’ सवय झाली आहे का? या गोष्टी मला खूप महत्त्वाच्या आहेत. लक्ष वेधून घेणार्‍या बर्‍याच गोष्टी आहेत. लोक अनेकदा चुका करतात. त्यामागे हजारो कारणे असू शकतात.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -