ताजी बातमी ऑनलाईन टीम
दोन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून रामदास विलास धुमाळ वय ३० व आकाश जनार्दन वायचळ वय २२ दोघे रा. लालनगर | इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून २ | मोबाईल, १ मोटरसायकल असा ‘५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर – जयसिंगपूर रस्त्यावरील हॉटेल कॉर्नर परिसरात दोघेजण मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी रामदास धुमाळ व आकाश वायचळ या दोघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले. आठ महिन्यापूर्वी यड्राव-कोंडिग्रे रस्त्यावर बोलत चाललेल्या व्यक्तीकडून जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला होता. तर दोनच दिवसापूर्वी जयसिंगपूरकोंडीग्रे रस्त्यावर अशाच पध्दतीने एका व्यक्तीचा मोबाईल जबरदस्तीने चोरला होता.
या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडून चोरलेले दोन मोबाईल व मोटरसायकल (एमएच ०९ बीयु ३६३४) असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भोसले, शिवानंद कुंभार, सफौ राजीव शिंदे, खंडेराव कोळी, पोहेकॉ संभाजी भोसले, रणजित पाटील, प्रशांत कांबळे, पोना बालाजी पाटील यांनी केली.
इचलकरंजी ; मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -