ताजी बातमी ऑनलाईन टीम
जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांना आता कॉर्पोरेट लूक येणार आहे. धान्य दुकानांचे आयएसओ मानांकन करण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आयएसओ मानांकनासाठी दुकानदारांनीही कंबर कसली आहे.
रेशन धान्य दुकानांचे आयएसओ मानांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच 1680 दुकानांचा लूक बदलला जाणार आहे. पारंपरिक रेशन धान्य दुकानाचे चित्र यानिमित्ताने पूर्ण बदलले जाणार आहे. दुकानांची स्वच्छता आणि पारदर्शी कामकाजाला प्राधान्य दिले जाणार आहे. रेशन दुकानांसह जिल्हा पुरवठा कार्यालय, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी यांची कार्यालये, सर्व गोदाम यांचेही आयएसओ मानांकन करून घेतले जाणार आहे.
रेशन दुकानांचे सध्या दिसणारे चित्र अधिक उत्साही आणि आकर्षक असेल. आकर्षक रंगसंगतीने दुकाने रंगवली जातील. दुकानदाराच्या अंगावर निळ्या रंगाचा ‘अॅप्रन’ असेल. दुकानात तो वापरणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक दुकानदाराला पुरवठा विभागाकडून ओळखपत्र दिले जाईल, त्यावर कोडही असेल. हे ओळखपत्र दुकानात वापरणे बंधनकारक राहील. प्रत्येक दुकानात आग प्रतिबंधक युनिट असेल, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील.
वजन-काटे प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावले जाईल, त्याबाबत शंका असल्यास कोठे तक्रार करायची, याबाबतचे क्रमांक, पत्त्याचाही बोर्ड दुकानाबाहेर लावला जाईल. दुकानदार, तसेच दुकानाबाबत काही तक्रारी असल्यास त्याबाबतही कोठे तक्रार करावी, याची माहिती देणारे बोर्ड लावणे बंधनकारक राहणार आहे. दुकानातील उपलब्ध धान्याची आवक-जावक, उपलब्ध साठा याचीही माहिती या बोर्डवर लिहिण्यात येणार आहे.
रेशन धान्य दुकानांना होणार बदल जाणून जाणून घ्या एका क्लिकवर
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -