ताजी बातमी ऑनलाईन टीम
दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत काही दिवसांपूर्वी जॅकलीन फर्नांडिससोबत अनेक इंटीमेट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. आता या फोटोंवर सुकेश चंद्रशेखरने स्वलिखित एक नोट जारी केली आहे. यामध्ये तो जॅकलीनचा बचाव करताना दिसत आहे.
सुकेशचे जॅकलीनचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये सुकेश जॅकलीनला किस करताना दिसला होता. जॅकलीनच्या गळ्यावर लव्ह बाईटदेखील दिसत होतं. त्यामुळे त्यांचा हा फोटो पाहून त्यांची रिलेशनशीपची चर्चा रंगली.
नंतर जॅकलीनने हे व्हायरल फोटो लोकांना आणि मीडियाला व्हायरल न करण्याची विनंती केली होती. आता सुकेशने आपल्या हातांनी नोट लिहिली असून तो जॅकलीनची बाजू मांडताना दिसत आहे. ‘मी आमचे खासगी फोटो सर्क्युलेट होताना पाहून खूप डिस्टर्ब आहे.
याविषयी मला न्यूजमधून समजलं. हे कुणीच्या प्रायव्हसी आणि पर्सनल स्पेसचं उल्लंघन आहे. मी याआधीही सांगितलं आहे की, जॅकलीन आणि मी नात्यात होतो. आम्ही एकमेकांना डेट करत होतो. आमचं हे नातं पैशांसाठी नव्हतं. जसं की, कमेंट आणि ट्रोल करून सांगितलं जात आहे. आमच्या रिलेशनशीपमध्ये खूप प्रेम आणि सन्मान होता. जेथे एकमेंकाकडून कुठलीही इच्छा वा अपेक्षा नव्हती आम्हाला.’ यानंतर सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसचा बचाव करताना आणखी काही गोष्टी लिहिल्या आहेत. त्याने म्हटलंय- २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीनचा संबंध नाही. ती निर्दोष आहे. मी सर्वांना विनंती करतो की, तिला या प्रकरणात चुकीच्या पध्दतीने ओढू नका. कारण, तिच्यासाठी ही साधारण गोष्ट नाही. कुठलीही अपेक्षा न करता तिन खूप सारं प्रेम दिलं आहे. जसं की, मी आधीही म्हटलं होतं की, या प्रकरणी ती कुठल्याही पध्दतीने सहभागी नव्हती.
जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरने ५६ लाखांचा घोड़ा, ३६ लाखांच्या चार मांजर आणि अनेक महाग गिफ्ट्स दिले आहेत. सुकेशने स्पष्ट केलं आहे आणि म्हटलं आहे की, जे महाग गिफ्ट्स मी तिला किंवा तिच्या फॅमिलीला दिले, त्या सामान्य गोष्टी आहेत. कुणीही आपल्या प्रेमासाठी करतं. हे वैयक्तिक आहे. मला समजत नाही की, ही इतकी मोठी गोष्ट का केली? हे गिफ्ट्स माझी वैध कमाईतून आहेत. ही गोष्ट लवकरच कोर्टात सिध्द केली जाईल.
आमचं प्रेम पैशांसाठी नव्हते, खूप प्रेम आणि सन्मान होता’ ! जॅकलीनसोबतच्या नात्यावर खुलासा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -