केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले की सरकार सोशल मीडियासंदर्भातील कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इथुन पुढच्या काळात देशात कार्यरत असलेल्या सर्व मायक्रो ब्लॉगिंग साइट्सना जबाबदारीने वागावे लागेल. तसेच या साइट्सने सरकारला उत्तर देणे बंधनकारक असेल.
फेसबूक देत आहे विनातारण 2 ते 50 लाखापर्यंत कर्ज ! व्हिडिओ पहा
सोशल मीडियाच्या कठोर नियमांसाठी राज्यसभेच्या सदस्यांची संमती मागताना ते म्हणाले की सरकार हा मुद्दा उचलून धरण्यास तयार आहे. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(एम) च्या नेत्या झरना दास वैद्य यांनी सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही नियम किंवा मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव म्हणाले, सभागृहाची संमती असल्यास आम्ही ट्विटर आणि फेसबुक सारख्या मायक्रो-ब्लॉगिंग साइटसाठी आणखी कठोर सोशल मीडीया नियम लागू करण्यास इच्छुक आहोत. या टप्प्यावर आम्ही राज्यघटनेच्या चौकटीत काम करत आहोत. पण, पुढे जाऊन सोशल मीडीयाला अधिक जबाबदार बनवण्याची गरज भासणार आहे. जर सभागृहातील सर्वांचे एकमत असेल तर आम्ही सोशल मीडीयासाठी आणखी कठोर नियम लागू करण्यास तयार आहोत.