महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआरची सक्ती असल्यामुळे कोरोना चाचणी न करताच बनावट आरटी-पीसीआर प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे निपाणी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले आहे. बनावट प्रमाणपत्रे कोल्हापूर शहरातील नामांकित प्रयोगशाळा तसेच महाविद्यालयातून मिळवली असल्याचे भासवले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात कोल्हापुरातील सहा, सातार्यातील एक आणि कर्नाटकातील दोघांचा समावेश आहे. पैकी तिघांना अटक करण्यात आली असून, आनंद ट्रॅव्हल्सची बस जप्त करण्यात आली आहे.
फेसबूक देत आहे विनातारण 2 ते 50 लाखापर्यंत कर्ज ! व्हिडिओ पहा
अटक केलेल्यांमध्ये आनंद ट्रॅव्हल्सचे दोन बसचालक सुरेश शिवाप्पा मडहळ्ळी (रा. विद्यानगर, हुबळी), सतीश पांडुरंग शिंदे (रा. सोनगेकरवाडी, ता. वाई, जि. सातारा) व कंडक्टर कम एजंट जगदीश दोड्डपरसापा (रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) यांचा समावेश आहे. शेफाली ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक अरबाज, एजंट अन्सार, आनंद ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक, सहारा ट्रॅव्हल्स बुकिंग ऑफिस व्यवस्थापक तसेच याच ट्रॅव्हल्सचा एजंट अहंमद (सर्वजण राहणार कोल्हापूर) या सहाजणांवर निपाणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.