Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यलतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती

लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर (Breach candy hospital) पत्रकार परिषद घेऊन डॉ. प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे उपस्थित होते. लता मंगेशकर यांची आज अचानक तब्येत बिघडली होती. त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही डॉक्टरांकडून सांगितलं जात होतं. त्यामुळे लतादीदींच्या चाहत्यांनीही रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली होती. मीडियाच्या प्रतिनिधींनीही ब्रीच कँडीत धाव घेतली होती. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही ब्रीच कँडीला दाखल झाले होते. त्यामुळे लतादीदींच्या प्रकृतीबाबत अधिकच चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, काही वेळी पूर्वी डॉक्टरांनी मीडियाशी संवाद साधला आणि लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -