Sunday, December 22, 2024
Homeनोकरीकमाल मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, 9 फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम...

कमाल मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, 9 फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, ‘1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची 9 फेब्रुवारी 2022 ही अंतिम तारीख आहे.’ अर्ज भरण्यासाठी या विद्यार्थ्यांकडे फक्त चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे त्यांनी वेळ वायाला न घालवता अर्ज करावा.

कोरोना काळात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. परीक्षा रद्द झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठीची कमाल मर्यादा ओलांडली. अशामध्ये हे विद्यार्थी चिंतेत आले होते कारण कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांना परीक्षेला बसता येणार नव्हते. पण शासनाने त्यांना एक संधी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार असून त्यांनी परीक्षेची तयार करुन तात्काळ अर्ज भरावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -