ताजी बातमी ऑनलाईन टीम
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात (Satara) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा एमआयडीसी (MIDC) आणि पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगारांच्या प्रश्नी भाष्य केलं. सातारा एमआयडीसी आणि अहमदनगर एमआयडीसी या एकाच वेळी सुरु झाल्या. अहमदनगरच्या एमआयडीसीची प्रगती झाली आणि सातारच्या एमआयडीसीची काय स्थिती झालीय. सातारा एमआयडीसीतील अनेक कंपन्या बाहेर गेल्या. मी कामगारांच्या प्रश्नी आवाज उठवला तर माझ्यावर 2 लाख रुपयांच्या खंडणीची केस टाकली. माझी ही अवस्था असेल तर कामगारांचं काय करतील. 2 लाख रुपयांची केस टाकता चिंधी चोर वाटलो काय? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला. अहमदगनरच्या तत्कालीन राजकीय नेत्यांना जे जमलं ते साताऱ्यातील त्यावेळच्या खासदार, आमदार यांना का जमलं नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.
उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
सातारची एमआयडीसी ही भारतातील प्रमुख हायवे सुवर्ण चतुष्कोनला लागून आहे. आज अहमदनगरच्या एमआयडीसीची प्रगती आणि सातारच्या एमआयडीसीची दुर्दशा यावर प्रत्येकानं आत्मपरीक्षण करायला हवं. या प्रकरणी बोललं की इतरांना राजकीय षडयंत्र वाटतं. 1974 साली मी लहान होतो, त्यावेळी राजकारणात नव्हतो. त्यावेळचे लोकप्रतिनिधी होते. त्यावेळच्या नगरच्या लोकप्रतिनिधींना जे जमलं त्यावेळी साताऱ्यातील लोकप्रतिनिधींना का जमलं नाही. सातारा एमआयडीसी ही आजारी एमआय़डीसी म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. एल अँड टी सारख्या इतर कंपण्या सातारा एमआयडीसीत आल्या नाहीत. कोयना आणि इतर 11 धरणं असून एमआयडीसी माळावर का गेल्या. हे प्रश्न विचारले तर कामगारांना गुन्हेगार ठरवलं जातं. हे दुर्दैवी आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
लोकांच्या वेदना समजून घेण्यासाठी ह्रदय लागतं
कारखानदारी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कोणत्या किमतीवर कारखानदारी करणार? लोकांच्या किमतीवर का? बँकांनी कर्ज दिलं होतं तर वसूल झालं पाहिजे. ती जागा 42 कोटी रुपयांची आहे. लोक रॉकेल ओतून घेत आहेत हे दिल्लीत टीव्हीवर पाहिलं. ज्या लोकांनी तुम्हाला, मला त्या पदावर बसवलंय. कामगारांच्या वेदना समजून घ्यायला ह्रदय लागतं. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात मी भांडलोय. माझ्यावर अनेक केसेस झाल्यात. पंडित ऑटोमोटिव्हची जागा 42 कोटींची आहे तर मी 16 कोटी रुपये देणारी लोक देतो. सर्वांची देणी देऊन टाका. बँकांची कुणाला पडलेली नाही. एमआयडीसीचं कुणाला पडलेलं नाही. एमआयडीसीतील ज्या कंपन्या निघून गेल्या त्यांना जाऊन विचारा. मी ज्यावेळी आवाज उठवला त्यावेळी माझ्यावर पोलीस केसेस झाल्या. भूमिपूत्रांना रोजगारात प्राधान्य द्यावं, असे नियम आहेत. मी आवाज उठवला तर माझ्यावर 2 लाखांची केस टाकली. यांचं काय करतील ते लोकं चिंध्या करुन टाकतील. मात्र, कामगारांनी घाबरू नये मी पाठिशी आहे. एमआयडीसीची वाढ व्हावी, प्रगती व्हावी या मताचा मी आहे. 2 लाखांची खंडणी चिंधी चोर वाटलो का? लोकांची प्रगती कशी होणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.
कामगारांबद्दल बोलल्यावर माझ्यावर 2 लाखांच्या खंडणीची केस; चिंधीचोर वाटलो का? MIDC च्या दुरावस्थेवर उदयनराजे भोसले आक्रमक
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -