Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई लोकल प्रवासात सतर्क रहा! चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी...

मुंबई लोकल प्रवासात सतर्क रहा! चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ बहिणीला चाकूचा धक दाखून त्यांची लूट करण्यात आली. दोघांकडे असलेला मोबाईल, बॅग खेचून चोरटे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. या चार चोरट्यांपैकी एका चोरट्याला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं. सोमवारी (काल) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ठाणे जिल्ह्यात मध्य रेल्वेवरील शहाड रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. संजू उर्फ सोनू मस्तान राऊत असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल दाखल आहेत. गेल्या काही काळापासून आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित भाऊ बहीण आंबिवली रेल्वे स्थानकाहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. आंबिवलीहून लोकल सुरू होताच लोकलमध्ये गर्दी नसल्याची संधी साधत चार तरुण त्यांच्याजवळ आले. यामधील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत या दोघांजवळील बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -