Sunday, December 22, 2024
HomeबिजनेसLIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

विमा क्षेत्रातील दादा कंपनी आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली आयुर्विमा महामंडळ ही देशांतर्गत बाजारात सर्वाधिक 64.1 टक्के हिस्सेदारी असणारी तसेच इक्विटीवर (Equity) सर्वाधिक 82 टक्के परतावा देणारी जगातील आघाडीची कंपनी ठरली आहे. 2020 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत एलआयसीचा वाटा 64.1 टक्क्यांहून अधिक होता. क्रिसिलच्या (crisil) अहवालानुसार, एलआयसी (LIC) ही आयुर्विमा प्रीमियमच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. क्रिसिलने नोव्हेंबर 2021 मध्ये तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. आता हा अहवाल प्राप्त झाला आहे. सकल लिखीत हप्त्यांचा (GWP) विचार करता हा देशातंर्गत बाजारपेठेत 64.1 टक्के आहे तो बाजार मुल्यांनुसार 56.045 अब्ज डॉलर इतका आहे.
बाजारात इतकी रक्कम असलेल्या जगातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा बाजारातील एलआयसीची हिस्सेदारी अधिक आहे. मार्च 2021 पर्यंत 13.5 लाख एजंट एलआयसीशी जोडले गेले होते, जे देशातील एकूण एजंट नेटवर्कच्या 55 टक्के आहे. IPO आणण्याच्या तयारीत असलेल्या आयुर्विमा महामंडळाच्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.

2000 पूर्वीच्या काळात एलआयसीचा बाजारातील हिस्सा 100 टक्के होता, जो हळूहळू कमी झाला. 2016 मध्ये 71.8 टक्क्यांपर्यंत खाली आला. 2020 मध्ये एलआयसीचा बाजारातील हिस्सा आणखी कमी होऊन 64.1 टक्क्यांवर आला.देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाइफचा 2016 मध्ये केवळ पाच टक्के आणि 2020 मध्ये आठ टक्के बाजार हिस्सा आहे. तर सकल लिखीत हप्त्यांचा (GWP) विचार करता हा देशातंर्गत बाजारपेठेत 64.1 टक्के आहे तो बाजार मुल्यांनुसार 56.045 अब्ज डॉलर इतका आहे. बाजारात इतकी रक्कम असलेल्या जगातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा हा बाजारातील एलआयसीची हिस्सेदारी अधिक आहे.मार्च 2021 पर्यंत, 13.5 लाख एजंट एलआयसीशी जोडले गेले होते, जे देशातील एकूण एजंट नेटवर्कच्या 55 टक्के आहे. ही आकडेवारी एसबीआय लाइफपेक्षा 7.2 पट जास्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -