Wednesday, July 23, 2025
Homeक्रीडाराहुलचं टीम इंडियात कमबॅक, धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर, कर्णधार कायरन पोलार्डला विश्रांती

राहुलचं टीम इंडियात कमबॅक, धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर, कर्णधार कायरन पोलार्डला विश्रांती

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मायदेशाल खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याला (2nd ODI) सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल. वास्तविक 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवलेला पहिला एकदिवसीय सामना भारताने 6 गडी राखून जिंकला होता. अशा परिस्थितीत आता त्याच मैदानावर सुरु असलेली दुसरी वनडेही भारताने जिंकली, तर मालिकेवर टीम इंडियाचाच ताबा असेल. मात्र, वेस्ट इंडिज संघाला ते अजिबात परवडणार नाही. त्यामुळे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

दरम्यान, दोन्ही संघांनी आपापल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. उपकर्णधार केएल राहुल संघात परतल्यामुळे आक्रमक फलंदाज इशान किशनला बाहेर बसण्यात आलं आहे. पहिल्या वनडेमध्ये त्याने 28 धावा केल्या होत्या. भारताने संघात फक्त हा एकमेव बदल केला आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ नियमित कर्णधार कायरन पोलार्डशिवाय मैदानात उतरला आहे. त्याच्या जागी निकोलस पूरन संघाचं नेतृत्व करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -