कोरोनाशी सामना करण्यासाठी त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे, हे आता सर्व जनमानसात रुळू लागले आहे. त्यामुळे आता पहिल्यासारखी भीती आणि गैरसमज न राहता नागरिक आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडत आहेत.
दोन वर्षांनंतर सर्व क्षेत्रांतील दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. प्रवासी सेवा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे गाव दूर झालेल्या किंवा आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी आसुसलेल्या व्यक्ती बिनधास्त गावोगावी जात आहेत. बंद असलेली पर्यटनसेवाही पूर्ववत सुरू झाली आहे.
नागरिकांना मास्क लावून बाहेर पडावे लागते. मास्क हा वेशभूषेतील एक अविभाज्य भाग बनला आहे. तसेच जसा मोबाईल न विरसता घ्यावा लागतो.
तसा मास्कही घ्यावा लागतोच. सॅनिटायझरची बाटली खिशामध्ये किंवा पर्समध्ये असतेच. ऑफिसमध्येदेखील सॅनिटायझर स्टॅण्ड बसवले आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये, दुकानात एक माणूस रजिस्टर घेऊन टेबल टाकून दारात बसला आहे.