Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रहिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्‍मठेप

हिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्‍मठेप

हिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड प्रकरणी हिंगणघाट जिल्‍हा आणि अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने आज आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली. विकेश नगराळे याला न्‍यायालयाने बुधवारी दोषी ठरवले होते. नगराळे हा गेली दाेन वर्ष कारागृहात आहे. मात्र शिक्षा भाेगताना हा कालावधी गृहीत धरला जाणार नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्‍ज्‍वल निकम यांनी दिली.

आराेपी विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा ठाेठवावी, अशी मागणी आम्‍ही न्‍यायालयाकडे केली हाेती. मात्र हा गुन्‍हा दुर्मिळातील दुर्मिळ नाही त्‍यामुळे याला फाशी देता येणार नाही, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केल्‍याचेही निकम यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -