Wednesday, January 14, 2026
Homeमनोरंजनया दिवशी रिलीज होणार अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज', मोशन पोस्टर रिलीज

या दिवशी रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’, मोशन पोस्टर रिलीज

यशराज फिल्म्सचा (YRF) आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट पृथ्वीराज वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महान सम्राट पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, संजय दत्त आणि सोनू सूद हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो हे जाणून घेण्यासाटी चाहते उत्सुक होते. अशात YRF ने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तर जाहीर केलीच शिवाय चार दमदार मोशन पोस्टर देखील रिलीज केले आहेत. यात चारही मुख्य कलाकारांचे लूक रिलीज करण्यात आले आहेत.

‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या ऐतिहासिक चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. पृथ्वीराजसारख्या महान योद्ध्यावर बनलेला हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 10 जून ठेवण्यात आली आहे कारण त्याच दिवशी यशराज फिल्म्सला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यशराज फिल्म्सने अशा खास प्रसंगी पृथ्वीराजला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -