Sunday, December 22, 2024
Homeबिजनेससेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, क्रिप्टोकरन्सींनाही फटका

सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, क्रिप्टोकरन्सींनाही फटका

कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स (BSE Sensex) शुक्रवारी सकाळच्या सत्रात तब्बल ९५० हून अधिक अंकांनी कोसळला. यामुळे सेन्सेक्स ५८ हजारांच्या खाली आला होता. तर निफ्टी (NSE Nifty) २५० हून अधिक अंकांनी खाली येऊन व्यवहार करत आहे. मुख्यत: जागतिक बाजारातील कमकुवत संकेताचा फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसला. इन्फोसिस शेअरमध्ये २ टक्के घसरण झाली. त्यापाठोपाठ विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एचडीएफसी, बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्सवर बँकांचे शेअर्स देखील घसरले.

हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये (Stock market updates) घसरण दिसून आली. Hero Motocorp चा निव्वळ नफा डिसेंबरच्या तिमाहीत ३६.७ टक्के कमी होऊन ६८६ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत Hero Motocorp ला १०८४ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. काल कंपनीने तिमाहीतील कंपन्यांच्या उलाढालीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर आज त्यांचे शेअर्स घसरले.

चलनवाढीची चिंता आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर वाढीबाबत मिळत असलेल्या संकेतामुळे शुक्रवारी क्रिप्टोकरन्सींमध्ये मोठी घसरण दिसून आली. बिटकॉइन (Bitcoin), इथेरियम (Ethereum) आणि शिबा इनू (Shiba Inu) ६ टक्क्यांपर्यंत घसरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -