Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानATM कार्डला जन्म तारखेचा पिन ठेवणं महागात

ATM कार्डला जन्म तारखेचा पिन ठेवणं महागात

एटीएम कार्डला चार आकडी पासवर्ड ठेवताना सहज सोपे क्रमांक टाळण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. असाच एक सोपा पिन म्हणजे वापरकर्त्याची जन्मतारीख. याकडे दुर्लक्ष करत स्वतःची बर्थ डेट वापरुन डेबिट कार्ड पिन तयार करणे मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. कारण अलिकडेच तक्रारदाराची बॅग मुंबई लोकल ट्रेनमधून दादर भागात चोरीला गेली होती. या बॅगमध्ये असलेल्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्डचा चोरट्याने वापर केला. चोराने सहज रेल्वे कर्मचाऱ्याची जन्म तारीख पिन म्हणून टाकली आणि ती तंतोतंत जुळली. एटीएम कार्डमधून चोराने तब्बल 75 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी हा पेशाने टीव्ही अभिनेता असल्याचं समोर आलं आहे. जिम सुदान असे त्याचे नाव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -