Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंगकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; 16 तारखेपर्यंत कॉलेज बंद

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; 16 तारखेपर्यंत कॉलेज बंद

कर्नाटकातील हिजाब वादावरून देशभरात रणकंदन सुरू असून हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था 16 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहेत.

राज्याचे उच्च शिक्षण मंत्री सी एन अश्वथ नारायण यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा निर्धारित वेळेतच होतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. याआधी शिक्षण विभागाने 9 ते 11 फेब्रुवारीदरम्यान शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

शाळा सुरू झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. संवेदनशील भागातील एसपी आणि डीसी यांनी प्रमुख शाळांना भेटी द्याव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लोकप्रतिनिधींनी देखील सहकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अराजक घटकांवर तातडीने कारवाई करा. पोलिस आणि प्रशासनाने शांततेच्या बैठका घ्याव्यात. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -