हुपरी हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर २८८ मधील गट नंबर ९२५/८अ या वादग्रस्त सरकारी कब्जात असलेल्या जमिनीवरुन वाद सुरू होता. या प्रकरणी येथील समस्त चर्मकार समाजाच्यावतीने गेल्या चाळीस दिवसांपासून आंदोलन सुरू होते. दरम्यान, आज मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी पोलीस महसूल विभाग आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त कारवाईत या ठिकाणचे सर्व अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे. यावेळी अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजताच हुपरी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. ट्रक, ट्रॅक्ट्रर, जेसीबी आदींसह हे अधिकारी येथे आले व त्यांनी न्यायलयाचा आदेश आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी थांबू नये असा इशारा दिला. आंदोलक महिलांना त्यानी येथून जावे असे सांगितले. त्यामुळे याभागात सकाळीच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.