ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज पैसे भरल्यास पाच महिन्यात पैसे दाम दुप्पट करून देतो असे म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद महात्मा गांधी चौक पोलिसात दाखल केली आहे.या विषयी अधिक माहिती अशी की सुनील श्रीपती तिवले वय 53 वर्ष व्यवसाय हॉटेल रा. जुना कुपवाड रोड टिळक नगर सांगली यांची मिरची हॉटेल समोर कॉर्नर मिरज येथे आरोपी अक्षय अनिल कांबळे वय 26 व्यवसाय शेअर मार्केटिंग रा.सदाळे
तालुका करवीर रवींद्र भोलानाथ देवणे रा.वडणगे यांनी फिर्यादी यांचा मित्र साक्षीदार म्हणून सचचिनंद रामचंद्र कदम रा. सांगलीवाडी यांना विश्वासात घेऊन सानविक वेल्थ मॅनेजमेंट एल पी या नावाने कंपनी रजिस्टर आहे सांगून तसेच
पैसे भरल्यानंतर पाच महिन्यात पैसे दाम दुप्पट करून देतो याची खात्री देऊन पैसे गुंतवलेल्या लोकांचे शेअर मार्केट मधून पैसे दाम दुप्पट करून परत दिले याबाबतचे पुरावे देऊन फिर्यादीस सुनील श्रीपती तिवले यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून चार लाख रुपये स्वीकारून परत न करता त्यांची फसवणूक केल्याची फिर्याद सुनील तिवले यांनी दिली असून त्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.