Friday, January 30, 2026
Homeब्रेकिंगशिवजयंतीला 500, ज्योतीला 200 जणांना परवानगी देणार

शिवजयंतीला 500, ज्योतीला 200 जणांना परवानगी देणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येत्या शनिवारी महाराष्ट्रात साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारने सोमवारी नियमावली जारी केली. त्यानुसार शिवज्योत दौडीत 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता 500 जणांना उपस्थित राहता येणार आहे.

गृह विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -