Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनज्या अपघातात अभिनेता दीप सिद्धूचा अंत झाला, त्या गाडीची अवस्था दाखवणारा व्हिडीओ...

ज्या अपघातात अभिनेता दीप सिद्धूचा अंत झाला, त्या गाडीची अवस्था दाखवणारा व्हिडीओ पाहा

ताजी बातमी ऑनलाइन टीम
याचा कार अपघातात (Car Accident) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जाताना दीप प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही धडक इतकी

जबरदस्त होती, की गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. अपघाताच्या वेळी दीप त्याच्या मित्रांसोबत प्रवास करत होता. यावेळी त्यांच्या कारमध्ये एक महिलाही होती. कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपला जामीन मंजूर झाला होता.

अपघातानंतर दीप सिद्धूचा मृतदेह खरसौदा रुग्णालयात पाठवण्यात आला . या अपघाताची माहिती मिळताच दीप सिद्धूच्या अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. दीप सिद्धू देशभरात गाजलेल्या किसान आंदोलनावेळी चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही तो आरोपी होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.

दीप सिद्धू हा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याचा जन्म 1984 मध्ये झाला होता. तो पंजाबी अभिनेता होता. दीप सिद्धूने कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाला. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -