Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रअनोख्या पद्धतीने डल्ला; हातपाय बांधून दरोडा, आठ लाख लुटले

अनोख्या पद्धतीने डल्ला; हातपाय बांधून दरोडा, आठ लाख लुटले

ताजी बातमी ऑनलाइन टीम

संकेश्‍वर-गडहिंग्लज मार्गावरील किल्लेदार मळ्यामध्ये दोन घरांवर फिल्मी स्टाईलने घरांमधील दोघांचे हातपाय बांधून दरोडा टाकत दरोडेखोरांनी चाकूच्या धाकाने सुमारे आठ लाखांची लूट केली. सोमवारी रात्री 8.15 च्या सुमारास हा प्रकार घडला. घरातील 140 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख 75 हजार रुपये असा ऐवज लुटण्यात आला आहे. दरोडेखोर आठ ते दहा जण होते, असे समजते. घटनेमुळे संकेश्‍वर परिसरामधील शेतवडीमध्ये राहणार्‍या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शशिकांत सातलिंग किल्लेदार आणि राम किल्लेदार यांच्या घरांवर हा दरोडा पडला. घरातील शशिकांत किल्लेदार, त्यांची आई शकुंतला यांचे हातपाय बांधून, प्लास्टिक पट्टीने तोंड बंद करण्यात आले होेते. स्थितीचा अंदाज घेत अज्ञात आठ ते दहा दरोडेखोरांनी किल्लेदार यांच्या घरात घुसून टीव्ही पाहत असलेल्या शकुंतला किल्लेदार यांचे हातपाय दोरीने बांधले. त्यांनी आरडाओरड करताच शकुंतला यांचे तोंड प्लास्टिक पट्टीने बंद केले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाणही केली. त्यानंतर दरोडेखोरांनी शशिकांत यांचेही हातपाय बांधले तसेच त्यांचेही तोंड बंद करून प्लास्टिक बुट्टीने त्यांच्या कपाळावर वार केला. यामध्ये शशिकांत बेशुद्ध पडले. त्यानंतर तिजोरी फोडून त्यातील सोन्याचे 120 ग्रॅमचे दागिने, रोख 75 हजार रुपये आणि राम किल्लेदार यांच्या बंद घराचा कडीकोंयडा तोडून, तिजोरी फोडून 40 ग्रॅम वजनाचे अलंकार, चिल्लर रक्‍कम घेऊन बाहेरून वाहनांचा आवाज येताच पोबारा केला आहे. पोलिसांनी तशी तक्रार नोंदवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -