डोळ्यांना थंडावा देण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे. यासाठी बटाट्याचे पातळ काप करून डोळ्यांवर ठेवा आणि अर्ध्या तासानंतर काढा.
डोळ्याचे पाणी थांबवण्यासाठी काकडीचे घरगुती उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळाने काढा.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. डॉक्टर देखील याची शिफारस करतात. भाज्यांमध्ये असलेले ल्युटीन डोळ्यांच्या समस्या दूर करते.
डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल आणि सतत पाणी येत असेल तर, यासाठी पाण्यात मीठ मिसळा आणि या पाण्यात कपडा भिजवून डोळ्यांवर ठेवा.
जेव्हा कधी डोळ्यांना पाणी येण्याची समस्या येत असेल, तेव्हा त्यावेळी डोळे थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यातील घाणही निघून जाईल. कधीकधी या घाणीमुळे डोळ्यांमध्ये जळजळ देखील होते.