Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडी...अन पंतप्रधान मोदी झाले किर्तनामध्ये दंग

…अन पंतप्रधान मोदी झाले किर्तनामध्ये दंग

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे संत गुरु रविदास विश्रामधाम मंदिराला भेट दिली. यावेळी मोदींनी कीर्तनात सहभागी होत मंजिरा वाजवला. विशेष म्हणजे कीर्तनावेळी पंतप्रधान मोदी यांनी हातात मंजिरा घेतला व तो वाजवला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.



नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात दर्शन घेतले. याबाबतचा व्हिडीओही मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी संत रविदासांचा जन्म झाल्याचे मानले जाते. आज 16 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होत असल्याने आजचा दिवस संत रविदासांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -