Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानफ्लिपकार्टवर विका तुमचा जुना फोन, कंपनीने सुरू केली 'सेल बॅक' स्कीम

फ्लिपकार्टवर विका तुमचा जुना फोन, कंपनीने सुरू केली ‘सेल बॅक’ स्कीम

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने ग्राहकांच्या सोयीसाठी एक अतिशय खास सेवा सुरू केली आहे. कंपनीने सेल बॅक सर्विस लॉन्च केली आहे. या सर्व्हिसअंतर्गत ग्राहकांना त्यांचे जुने मोबाईल फोन विकण्यासाठी एक प्लेटफॉर्म प्रदान करण्यात आले आहे. फ्लिपकार्टने सेल बॅक स्कीम इलेक्ट्रॉनिक रीकॉमर्स कंपनी यंत्राच्या अधिग्रहणानंतर लॉन्च केली आहे.

Flipkart च्या ग्रोथ चार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख रप्रकाश सिकारिया यांनी एका निवेदनात म्हटले की “Flipkart च्या सेल बॅक प्रोग्रामसह हे मार्केट व्यवस्थित करण्यासाठी मदत करणे हे आमचे ध्येय आहे. भारतीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची झपाट्याने वाढ होत असताना हा कार्यक्रम ई-कचऱ्याची निर्मिती कमी करण्याच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना पुढे घेऊन जाईल. एक शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हा कार्यक्रम सर्व मोबाईल फोनसाठी लागू असेल. मग तो फ्लिपकार्टवर खरेदी केलेला असो किंवा नसो आणि या वर्षाच्या अखेरीस अतिरिक्त श्रेणींमध्ये सादर केला जाईल. सध्या हा कार्यक्रम दिल्ली, कोलकाता आणि पाटणा सारख्या शहरांमध्ये 1,700 पिन कोडवर लाइव्ह आहे.

ग्राहक फ्लिपकार्ट अॅपवर (बॉटमबार ) जाऊन बॉटमबारमध्ये पर्यायांमधून ‘सेल बॅक’ ऑप्शन निवडू शकतात. 3 सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही वापरलेल्या मोबाईल फोनच्या किंमतीचा अंदाज लावू शकता. ग्राहकांच्या पुष्टीकरणानंतर Flipkart एक्झिक्युटिव्ह 48 तासांच्या आत तुमच्या दारात उत्पादन घेईल. पुष्टी केल्यावर पुष्टी केलेल्या विक्री किंमतीनुसार Flipkart व्हाउचर काही तासांत जारी केले जाईल.

जयंत झा, अंकित सराफ आणि अनमोल गुप्ता यांनी 2013 मध्ये स्थापन केलेले यंत्र स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांसारख्या नाविन्यपूर्ण ग्राहक तंत्रज्ञान उत्पादनांची दुरुस्ती आणि विक्री करते. भारतातील रीकॉमर्स मार्केट झपाट्याने वाढत आहे. भारतीय स्मार्टफोन नूतनीकरण बाजार अद्याप मोठ्या प्रमाणात असंघटित आणि खंडित आहे. त्यामुळे शेवटच्या ग्राहकांसाठी विश्वास आणि सुविधांचेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -