वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. श्रीलंकेचा संघ भारतात तीन टी-२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या दौ-याआधी टीम इंडियासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत आहे. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा संघात पुनरागमन करेल असे समजते आहे.
क्रिकेट वेबसाईट क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरला आहे. श्रीलंकेविरुद्ध २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेतून तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये प्रदीर्घ पुनर्वसनानंतर रवींद्र जडेजा लखनऊला पोहोचला आहे. येथे तो क्वारंटाईनमध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारीला लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे.
विराट कोहलीला विश्रांती देण्याची शक्यता…
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात २४ फेब्रुवारीला पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. यानंतर पुढील दोन सामने हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे होणार आहेत. हे दोन्ही सामने २६ आणि २७ फेब्रुवारीला खेळवले जाणार आहेत. माजी कर्णधार विराट कोहलीला टी २० मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, तो कसोटी मालिकेत भाग घेणार असल्याचे समजते.