Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीदिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब?; राणेंचा...

दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब?; राणेंचा पुन्हा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करत आपल्या जहाल वाकबाणांनी घायाळ करून सुरू ठेवले आहे. आता त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केलेत. दिशा सालियनवर  बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील ८ जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला.

राणे म्हणाले, हे सारे सुशांत सिंगला जेव्हा कळलं, तेव्हा तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कुठे झाले. 13 जूनला गायब झाले. त्याआधी होते. सोसायटीतील लोक सांगतात. ठराविक माणसांची अॅम्ब्युलन्स कशी आली. हॉस्पिटलला त्याला कोणी नेले. याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे ही उघड होणार. तेही माहिती करतील सर्व. रमेश मोरेंची हत्या कुणी केली. का केली कुणी केली. त्यांची कुणाचा संबंध नव्हता. जयंत जाधवची हत्या का झाली. आम्ही काढलं नाही. खोलात जाईल हे आम्हाला माहीत नाही का, असा इशाराही त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -