Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, मोटरसायकल 200 फुट दरीत कोसळली

शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, मोटरसायकल 200 फुट दरीत कोसळली

भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या  दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फुट दरीत कोसळली. ही घटना सकाळी साडेतीनच्या सुमारा घडली असून वरंध घाटात अपघात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. अपघातामध्ये तीघेजण एकाच मोटारसायकलवर होते. गाडीवर संयम सुटल्याने हा प्रकार घडला आहे. तिघांनाही महाडच्या ग्रामीण रूगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण अशा घटना घडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या ठिकाणी दु:ख व्यक्त कऱण्यात येत आहे. कालपासून महाराष्ट्रात अशा अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 हे तरूण गाडीवरून पडल्यामुळे जखमी झाले आहेत.

शिवजयंती संपुर्ण महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते, तसेच प्रत्येक भागात वेगवेगळ्या पध्दतीने जयंती साजरी होताना आत्तापर्यंत आपण अनेकदा पाहिलं देखील आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या जयंतीचा उत्सव यंदा जोरात होणार असं वाटतंय. कारण मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे शिवजयंती साजरी करण्यात आली. यंदा अधिक उत्साहाने शिवजयंती साजरी करीत आहेत. भोर इथून तीन तरूण एकाच मोटारसायकलवरून निघाले होते. त्यावेळी घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी त्यांना जवळच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात केले. एकाला किरकोळ लागले असल्याने प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे, दोघेजण तिथल्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी मोटारसायकल चालवत असताना नव्या ठिकाणी काळजी घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -