Monday, December 23, 2024
Homeजरा हटकेटायगर श्रॉफच्या व्हिडिओवर दिशा पटानीची भन्नाट कमेंट, म्हणाली की…!

टायगर श्रॉफच्या व्हिडिओवर दिशा पटानीची भन्नाट कमेंट, म्हणाली की…!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि उत्तम नृत्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. टायगर अनेकदा त्याचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. टायगरचा म्युझिक व्हिडिओ अनबिलीवेबल 2020 मध्ये आला होता. यानंतर कॅसानोव्हा आणि नंतर देशभक्तीपर एक गाणे वंदे मातरम. यानंतर आता टायगरने त्याच्या चाहत्यांसाठी पूरी गल बातचा टीझर आणला आहे. टायगर श्रॉफच्या ‘पुरी गल बात’चा टीझर आल्यापासून चाहते ते पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.

टायगर श्रॉफने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानीने ही कमेंट केली आहे. टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वत: टायगर श्रॉफ दिसतो आहे. या 30 सेकंदांच्या व्हिडिओच्या शेवटी टायगर श्रॉफचा आवाज ऐकू येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टायगरने लिहिले की, ‘मी प्रयत्न केलेल्या सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे. मला काही बोलायचे नाही पण मी माझ्या आयुष्यातील पहिला पंजाबी/इंग्रजी पूरी गल बात, लवकरच येत आहे. टायगरच्या या पोस्टवर अभिनेत्री दिशा पटानीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

टायगरची ही पोस्ट पाहून दिशाने कमेंटमध्ये लिहिले की, ‘वाह’. त्याचवेळी दिशाने तिच्या कमेंटसोबत बरेच फायर इमोजीही टाकले आहे. टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफनेही तिच्या मुलाच्या या सिंगर टीझरवर प्रेमाचा वर्षाव केला. दिशा पटानीने काही दिवसांपूर्वी हॉट फोटो शूट केले होते. स्विमिंगपूलच्या मधोमध उभं राहून टी-पिसमधील फोटो शेअर केले होते. या फोटोवर अभिनेता टायगर श्रॉफनेही कमेंट केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -