Sunday, December 22, 2024
Homeक्रीडानाणेफेक जिंकून कायरन पोलार्डचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

नाणेफेक जिंकून कायरन पोलार्डचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात आज शेवटचा तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता आहे. पण वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. याआधी वनडे मालिकेत भारताने 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलं होतं.

तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय टीम मॅनेजमेंटने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या तिघांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे आजच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये हे तिघेही खेळताना दिसणार नाहीत. भारताने मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल पहायला मिळू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -