लाखो दिलो की, धडक असणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात रश्मिका आधीपासूनच सुपरहिट होती, परंतु आता संपूर्ण जगभरात तिचे चाहते तयार झाले आहेत.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे मुंबईत डेटवर जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्या लग्नाबद्दल देखील अनेक गोष्टी पुढे येत आहेत. हे दोघेही लवकरच लग्नबंधण्यात अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावर्षीच हे लग्न करणार आहेत. मात्र, अजूनही रश्मिका आणि विजय यांनी आपल्या रिलेशनसंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
चाहत्यांना देखील विजय आणि रश्मिका यांची केमिस्ट्री बघायला प्रचंड आवडते. असे म्हटले जात आहे की रश्मिका आणि विजय रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस ते लग्न करू शकतात. विजय देवरकोंडा पुरी जगन्नाधच्या लिगरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रश्मिकाने नुकतेच मुंबईत एक अपार्टमेंट विकत घेतले आहे आणि तिथेच ती राहते आहे. रश्मिका आणि विजय मुंबईत अनेकदा डेटवर जाताना दिसले. चाहते आता आतुरतेने वाट पाहात आहेत की, विजय आणि रश्मिका त्यांच्या लग्नाची गोड बातमी कधी देणार.