Wednesday, August 27, 2025
Homeसांगलीमिरजेत सेंटरींग काम करणाऱ्या बांधकाम कामगार तरुणाचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

मिरजेत सेंटरींग काम करणाऱ्या बांधकाम कामगार तरुणाचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

मिरज/ प्रतिनिधी
मिरजेतील गुरुवार पेठेतील जय भवानी मेटल मार्ट या दुकानाचे बांधकाम सुरू आहे , बांधकाम तिसऱ्या मजल्यापर्यंत गेल्या नंतर त्या ठिकाणी सेंटरींग चे काम करणारा बांधकाम कामगार तरुण सोहेल दस्तगिर मुल्ला , वय 25 रा. पिरजादे प्लॉट , शास्त्री चौक , मिरज हा तरुण शनिवारी काम करीत असताना लिफ्ट च्या बोगद्यातून सरळ खाली येऊन तळघराच्या जमिनीवर येऊन पडला गंभीरपणे जखमी झालेल्या सोहेल ला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे , संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी याबाबत लक्ष घालून इमारतीचे मालक , बिल्डर आणि इंजिनियर व सेंटरिंग मेस्त्री यांचेवर वर जोरदार टीका केली बांधकाम चे काम करून घेताना बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा कोणताही विचार केला जात नाही , आवश्यक असणाऱ्या सुरक्षेसाठी साधन सामग्री बांधकाम व्यावसायिकांकडून पुरविली जात नाही त्यामुळे अशा *बांधकाम व्यावसायिक इंजिनियर बिल्डर आणि जागा मालक आणि बांधकाम करवून घेणाऱ्या मिस्त्री वर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्याकडे केली आहे , तर सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांनाही ह्या घटनेची माहिती देऊन निष्पाप बळी गेलेल्या *सोहेल मुल्ला यांच्या कुटूंबियांना शासनाकडून मदत आणि थोडीशी भरपाई म्हणून दोन ते पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे , मयत सोहेल मुल्ला हा कुटुंबात एकटा कमविता असून त्याचे आई वडील वयस्कर असून दीड वर्षाचे एक बाळ असून त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे , सोहेल मुल्ला यांच्या पाठीमागे एक लहान भाऊ ही आहे त्यामुळे डॉ महेशकुमार कांबळे यांनी या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्वोपतरी मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे*

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -