Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनमहाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काय म्हणाले?

महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काय म्हणाले?

राज्यातील corona रुग्णांची संख्या घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरणावर भर द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मास्क काढण्याबाबतच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उसर(ता.अलिबाग) येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मास्कवर भाष्य केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -