ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत गेल्या १९ फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात ( shibani dandekar wedding ) अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर सध्या शिबानी दांडेकरने आपलं नाव बदलून शिबानी दांडेकर-अख्तर असे केल्याचे माहिती समोर आली आहे.
जवळपास ४ वर्षे डेट केल्यानंतर फरहान-शिबानी यांनी १९ फेब्रुवारी रोजी दोघे लग्नबंधनात अडकले. हे लग्न अख्तर फॅमिलीच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये पार पडले. या कपलने काही हटके करण्याचा निर्णय घेतला. शिबानी आणि फरहानने Vow तसेच रिंग सेरेमनी करून सात जन्मापर्यंत एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला.!
या लग्नसोहळ्यात सूटेड बूटेड लुकमध्ये फरहान हँडसम तर शिबानी रेड अँड बेज कलरच्या गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती. वेडिंग लुकमध्ये शिबानीने सुंदर रेड कलरचा ड्रेस घातला होता. त्यांच्या लग्नाचे आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत.