Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेRBI rules: फाटलेल्या नोट बदलण्यासाठी करावी लागणार नाही आता धावपळ, आरबीआयने केले...

RBI rules: फाटलेल्या नोट बदलण्यासाठी करावी लागणार नाही आता धावपळ, आरबीआयने केले नवीन नियम जाहीर !

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जर तुमच्याकडे एखादी फाटलेली नोट (torn note) असेल किंवा एखाद्या नोटेवर सेलोटेप लावलेली असेल तर अशा वेळी कोणताही दुकानदार तुमची नोट स्वीकारत नाही. ही फाटलेली नोट अनेकदा कोणी घेत नसल्यामुळे आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो परंतु ही फाटलेली नोट नेमकी आपल्याकडे ठेवायची का? जर तुमच्याकडे सुद्धा एखादी नोट फाटलेली असेल व एखाद्या नोटेवर सेलोटेप चिकटवलेला असेल तर अशा वेळी घाबरून जाऊ नका.



कोणत्याही प्रकारची चिंता करू नका या माहितीचा उपयोग करुन तुम्ही भविष्यात अनेक समस्या दूर करू शकतात. तुम्हाला तुमच्या जुन्या नोटा बद्दल योग्य नवीन नोट मिळेल. नोट बदली करण्यासाठी आरबीआय(Reserve bank of India) ने काही नियम बनवले आहेत. हे नियम सर्वसामान्य लोकांना अद्याप ही माहिती नाहीये. चला तर मग आपण जाणून घेऊया बँकेबद्दलचे असे काही नियम.

हे आहेत बँकेचे नियम
भारतीय रिजर्व बँक ऑफ (RBI) च्या वर्ष 2017 मधील एक्सचेंज करेंसी नोट नियम नुसार जर तुम्हाला एटीएम मधून फाटलेली किंवा चीपकवलेली नोट मिळाल्यास तर अशावेळी या प्रकारच्या नोट तुम्ही सहजच बदली करू शकता आणि कोणतीही सरकारी बँक या नोटांना बदली करण्यास मनाई करू शकत नाही.

तुम्हाला आरबीआयच्या अधिकृत ऑफिसमध्ये जाऊन तेथे या नोटा तुम्हाला जमा करायचे आहेत. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यावर सहकारी बँक प्रायव्हेट बँक किंवा एखाद्या करन्सी चेस्ट तसेच आरबीआय यांनी अधिकृत केलेल्या एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या नोटा बदलू शकता.

तुमची फाटलेली नोट आणि तुमच्या पैशांच्या स्थिती या गोष्टी अवलंबून असते की तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील की नाही. जर तुमचे पैसे थोड्या प्रमाणात फाटलेले असतील तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील परंतु जर नोट ची स्थिती खूपच खराब झालेली असेल जास्त प्रमाणामध्ये पैसे फाटले असतील तर अशा वेळी तुमच्या नोटेचे मूल्यांकन केले जाते आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात.

अशाप्रकारे करा तक्रार
जर एखादी बँक तुमच्याकडे फाटलेली व चिपकवलेली नोट जमा करून घेण्यास मनाई करत असेल तर अशावेळी तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकतात. वरील लिंक ही स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम ची आहे. जर बँक नियमांचे उल्लंघन करते तर बँक अधिकाऱ्यांनी विरोधात योग्य ती कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर बँक ला दहा हजार रुपयांपर्यंत दंड सुद्धा द्यावा लागू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -