Saturday, November 23, 2024
Homeराजकीय घडामोडीNawab Malik यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी

Nawab Malik यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने आर्थिक गैरव्यवहार  प्रकरणी बुधवारी अटक केली. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. तर कोर्टाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. आता नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘नवाब मलिकांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांचे भाऊ कप्तान मलिक यांना समन्स जारी केले आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे.’ पण कप्तान मलिक यांनी त्यांच्यावर केलेला हा दावा फेटाळून लावला आहे. कप्तान मलिक यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मलिक कुटुंबाला कितीही दाबलं तरी ते थांबणार नाही. आम्हाला नवाब मलिक वडिलांप्रमाणे आहेत. त्यामुळे ते जे काही आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. मला ईडीने कुठलीही नोटीस बजावली नाही.’

दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ईडीने दाऊद इब्राहीम आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळून आले. त्यानुसार ईडीने बुधवारी मलिकांवर कारवाई करत त्यांना अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -