Sunday, July 6, 2025
Homeजरा हटकेचित्रपटासाठी आलिया भटने पांढऱ्या रंगाची साडी का निवडली, जाणून घ्या यामागचे कारण!

चित्रपटासाठी आलिया भटने पांढऱ्या रंगाची साडी का निवडली, जाणून घ्या यामागचे कारण!

बॉलिवूडची ‘गंगूबाई’ म्हणजेच आलिया भट्ट सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. पण या चित्रपटाबाबत बराच वाद सुरू आहे. चित्रपटाचे नाव बदलता येईल का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने संजय लीला भन्साळी यांना केली आहे. सध्या तरी निर्मात्यांनी यावर कोणतेही मत दिलेले नसले तरी या प्रकरणावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. दुसरीकडे अभिनेत्री आलियाकडून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? आलिया भट्टने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये फक्त पांढऱ्या रंगाची साडी परिधान केला आहे. इतकेच नाही तर ती भारतापासून दूर बर्लिनमध्ये तिचा पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा घेऊन गेली आहे. अशा परिस्थितीत आलियाने फक्त पांढऱ्या रंगाचा ड्रेस का परिधान केला आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या मागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

आलिया भट्टने सोशल मीडियावर आतापर्यंतचे सर्व फोटो शेअर केले आहेत आणि ती ज्या कार्यक्रमांना गेली आहे त्यात तिने फक्त पांढरा सूट, साडी किंवा ड्रेस घातला आहे. अशामध्ये आलिया भटने स्वत: यावर काहीही सांगितले नाही परंतु अभिनेत्रीची स्टायलिस्ट अमी पटेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये आलिया पांढऱ्या रंगाच्या शामीर साडीत दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, ‘असे म्हणतात की पांढरा रंग खूप खास असतो कारण त्यात इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात.’

अमी पटेलने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘मी पाहिले की गंगूबाई काठियावाडीत माणसाच्या आत प्रत्येक भावना असते… उत्सव, कृतज्ञता, दयाळूपणा, शेअरिंग आणि प्रेमाचे प्रत्येक रंग जे शक्य आहे. या अप्रतिम कामगिरीसाठी. आलिया भट्टला सलाम.’ दरम्यान, आलिया भट्टने जणू पांढर्‍या साडीचा एक नवीन फॅशन ट्रेंड बनवला आहे आणि ती प्रत्येक लूक अतिशय अप्रतिमपणे कॅरी करत आहे आणि चाहत्यांना तिची स्टाईल आवडते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -