Saturday, July 5, 2025
HomeसांगलीSangli : पतीच्या खूनप्रकरणी महिलेस जन्मठेप

Sangli : पतीच्या खूनप्रकरणी महिलेस जन्मठेप

आजाराने ग्रस्त असलेल्या पतीचा वस्तर्‍याने खून केल्याबद्दल शांताबाई उर्फ शोभा कल्लाप्पा बागडी ( वय 25 , रा. इंदिरानगर झोपडपट्टी,तासगाव ) या महिलेस जन्मठेप व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. वैशाली मुरचिटे यांनी काम पाहिले.

आरोपी शांताबाई व तिचे पती कल्लाप्पा बागडी इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव येथे राहत होते. कल्लाप्पा यांना टी. बी. झाला होता. या आजारामुळे त्यांना काम धंदा करता येत नव्हता. सन 2019 मध्ये जेवण देण्याच्या कारणावरून शांताबाई व कल्लाप्पा यांच्यामध्ये वादावादी झाली होती. या वादावादीमध्ये शांताबाई हिने घरातील धारदार वस्तर्‍याने कल्लाप्पा यांचा गळा चिरून निर्घृण खून केला होता व त्यांनी आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. तशी तक्रार देखील शांताबाई यांनी तासगाव पोलिसात दिली होती.

तपासादरम्यान कल्लाप्पा यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी शांताबाई बागडी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. कल्लापा यांची आई व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने शांताबाई बागडी हिला भा.दं.वि. कलम 302 अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला हवालदार रवींद्र माळकर, फौजदार शरद राडे, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले, गणेश वाघ यांनी मदत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -