ताजी बातमी ऑनलाईन टीम
काल दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजीपासून छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आझाद मैदानवर आमरण उपोषण सुरू ठेवले आहे.त्या छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणासाठी आज सांगली जुनी भाजी मंडई,शिवपुत्र ग्रुप तसेच दुकानदार यांच्या वतीने छञपती संभाजी महाराज यांच्या आमरण उपाेषणाला पाठिंबा देण्यात आला.
एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत पाठिंबा जाहीर केला.तसेच छञपती शिवाजी महाराज की जय या घाेषणा देण्यात आल्या.यावेळी रवी भाऊ कदम, स्वप्निजीत पाटील, इब्राहिम लिंबुवाले,जावेद बागवान, संजय माळी, रमजान महात,पांडुरंग शिंदे,सुनीता माळी, तंगवा काेळी तसेच दुकानदार आणि महिला वर्ग माेठ्या संखेने उपस्थित होता.