Saturday, July 5, 2025
Homeमनोरंजनअबब..! अमृता फडणवीस यांच्या 'शिव तांडव'ला अगदी कमी कालावधील मिळाले लाखोंमध्ये व्ह्यूज

अबब..! अमृता फडणवीस यांच्या ‘शिव तांडव’ला अगदी कमी कालावधील मिळाले लाखोंमध्ये व्ह्यूज

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात. त्या सतत आपले नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आणतात. नुकतंच त्यांचा एका गाण्यानं देशभरात ‘धूमाकुळ’ घातला आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाशिवरात्री जवळ आल्यानं भगवान शंकरावर (Lord Shankar) एक गाणं (Amruta Fadnavis Song Video) म्हटलं आहे. हे गाण सगळ्यांना ज्ञात असून, त्यांनी ‘शिव तांडव’ स्तोत्राचा रिमेक केला आहे. टाईम्स म्यूजिकनं त्यांच्या या शिव तांडवला प्रदर्शित केलं आहे.



अमृता फडणवीस यांनी 24 फेब्रुवारीला हा नवा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनखाली लिहिलं की, ‘जेव्हा तुम्हाला जग जिंकण्यासाठी अधिक उर्जाची आवश्यकता असते. तेव्हा हेडफोन घालून हे पाहा आणि ऐका. तुमच्या आत्म्याला बरं करण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठीचं हे गाणं.. आज प्रदर्शित झालं.’
दरम्यान, आत्तापर्यंत या गाण्याच्या व्हिडिओला यूट्यूबवर 6 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या कमी वेळात प्रचंड व्ह्यूज मिळाल्यानं प्रेक्षकांना हे गाणं भलतच पसंत पडलं असल्याचं म्हंटल जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -